We use cookies to personalise content and ads, to provide social media features and to analyse our traffic. Read more…
पहिलं प्रेम कसं विसरायचं ?

पहिलं प्रेम कसं विसरायचं ?

Balwant College, Vita, 415311, India

Get Directions

8220652066

Categories
Work hours Add information
About * मी जिच्यावर मनापासुन प्रेम केलं तिच्या सुखद स्मृतींना अर्पण *!!
.
Page owner - Shakti Shelke
पहिलं प्रेम कसं विसरायचं ? cover
Mission 30000
Description प्रेमपत्र
पत्राची सुरुवात प्रियने केली नाही, कारण ते लिहिण्याइतकी आज तू माझी राहिलेली नाहीस. असो. आपल्याशेवटच्या भेटीला आता चार वर्षे होतील. पण या चार वर्षांंत मी माझ्याशीही जे कधी बोललो नाही, ते आजया पत्रात लिहितोय. ते तुझ्यासाठी नाही तर फक्त माझ्या समाधानासाठी. चार वर्षांपूर्वी तुझा शेवटचा पेपर संपल्यानंतर कॉलेजच्या बाहेर आपण भेटलो होतो. खरं तर तुझ्या घरी आपल्याबद्दल कळल्यापासून आपल्याला प्रत ्यक्ष भेटणं फारसं कधी जमलंच नाही. पण तरीही आपण त्या दिवशी भेटलो. शेवटचं. तुझे आई-बाबा तुझ्यासाठी स्थळ शोधत असल्याचं त्या दिवशी तू मला सांगितलंस आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण मी तेव्हा तुला वचन दिलं, एका वर्षांत स्वत:च्या पायावर उभं राहूनतुझ्याशी लग्न करण्याचं. त्या दिवशीतुझा निरोप घेतला अन् मुंबई गाठली. या स्वप्ननगरीत अनेकांची स्वप्नं साकार होतात असं मी ऐकलं होतं. म्हणून मीही माझं इवलंसं स्वप्न घेऊन या स्वप्नवेडय़ांच्या गर्दीत सामील झालो. कधी रडत-पडत, कधी स्वत:च स्वत:ला सावरत मी प्रवास करू लागलो. आजूबाजूला असलेल्या लाखोंच्या गर्दीतही मी फक्त तुझाच विचार करत राहिलो. वाटायचं तुझ्याशी एकदातरी बोलावं. मात्र ते शक्य नव्हतं. पण अचानक एक दिवस तुझा फोन आला. नऊ-दहा मिनिटांचा कॉल तो. पण आपण दहा शब्दहीबोललो नाहीत, नुसतंच रडत राहिलो. मी मजेत आहे, तू फक्त तुझी काळजी घे म्हणत तू फोन ठेवलास तो कायमचा. मी झपाटल्यागत अभ्यासाला लागलो. अन् एकदिवस मुंबईतल्या एका मोठय़ा कॉलेजातून गोल्डमेडल मिळवून बाहेर पडलो. काही दिवसांतच मला नोकरीही मिळाली. अन् माझं स्वप्न साकार झालं.
तुला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी त्याच दिवशी मुंबईहून तुझ्याकडे आलो. पण स्टेशनवरच मित्राकडून कळलं की दोन दिवसांपूर्वीच तू लव्ह मॅरेजकेलंस म्हणून. मी क्षणात उद्ध्वस्त झालो. माझ्या सगळ्या स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर झाला. काय करावं काहीच सुचत नव्हतं. क्षणभर वाटलं, उधळून टाकावं या आयुष्याला आणि व्हावं एकदाच मुक्त या भावनांच्या जीवघेण्या खेळातून. पण.. त्यातूनही काहीच साध्य होणार नव्हतं. मी तसाच मुंबईत परतलो. पण यावेळी माझ्या आयुष्याला काही अर्थच उरला नव्हता. फक्त जगायचं म्हणून जगत होतो. दिवस लोकांच्या गर्दीत, कामाच्या व्यापात कसाबसा सरायचा पण रात्र मात्र खूप छळायची. रात्र-रात्र जागून काढायचो. खूप खूप विचार केला, पण माझ्या कुठ

Similar places nearby