We use cookies to personalise content and ads, to provide social media features and to analyse our traffic. Read more…
Sunday
08
APR

मृगगड श्रमदान मोहीम (०८ एप्रिल २०१८)

06:00
18:00
दुर्गवीर
Event organized by दुर्गवीर

Get Directions

Category
#var:page_name# cover

दुर्ग हे राज्याचे सार, ज्याच्याकडे दुर्ग तो बलदंड, श्रेष्ठ. गडांच महत्व जाणून महाराजांनी अनके गड स्वराज्यात जोडले आणि ह्या गडदुर्गानी पण स्वराज्य निर्मितीत मोलाची साथ दिली. गड हे नेहमीच महाराजांच्या पाठी उभे राहिले. अनेक लढाया ह्यांनी पहिल्या. अनेक योद्धे पहिले, जय पराजय पहिले. अनके वार झेलले. नेहमीच सह्याद्री सोबत ताठ मानेने उभे राहिले आज एकविसाव्या शतकात गडांना खुप वाईट दिवस पहावे लागत आहेत. त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आ वासून उभा आहे. काही तर आपलं अस्तीत्वच हरवून बसलेत. एकेकाळच हे आपलं घर आणि आज मंदिर. आपण आपलं घर, मंदिर पडताना आपण कस काय पाहू शकतो. परत त्यांना उभ करण हे आपलं, सर्वांच कर्तव्य आहे. त्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान गेली १० वर्षे गड संवर्धनाचे कार्य नित्यनेमाने करीत आहे. ह्या रविवारी किल्ले मृगगडवर श्रमदान मोहीम आखण्यात आली आहे. (०८ एप्रिल २०१८). तुम्हीही ह्या कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्ही ह्या कार्यात कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ शकता. मग श्रमदान असेल, आर्थिक मदत असेल किंवा कार्यात लागणाऱ्या वस्तू देवून त्यासाठी संपर्क करा.
९१६७४५१८४४
८१०८३६६४४७
www.durgveer.com